बिल्डर सुशील रहेजा की गिरफ्तारी की मांग।

रवि निषाद
1 Min Read

खासदार व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण मध्य मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री.काचरू यादव यांच्या नेतृत्वात आरोपी सुशील रहेजा याला अटक करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.आंदोलनादरम्यान गोवंडी पोलीस ठाण्याने आंदोलकांना ताब्यात घेतले.त्यानंतर आरोपी सुशील रहेजा याला तात्काळ अटक करण्याची मागणी करणारे निवेदन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.पूर्णिनाथ सावन यांना सादर करण्यात आले.

हे आंदोलन व निवेदन सादरीकरण मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस श्री.आझम लब्बई,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नागरी विकास विभागाचे महासचिव श्री. धाता मिश्रा,बीएमसी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सौ. अनिता पाटोळे,श्री.राजेंद्र नगराळे,श्री.हरीश विचारे, श्री.सुनील ढाका,श्री.काझी,श्री.जमील तसेच अनेक पदाधिकारी,महिला काँग्रेसच्या प्रतिनिधी व पक्षाचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *