top of page
Writer's pictureRavi Nishad

स्वतंत्रता दिवस पर नाजताई के सौजन्य से वृक्ष लगावो अभियान

स्वातंत्र्यदिना निमित्त नाज़ताई शेख यांच्या वतीने वृक्ष वाटपाचा कार्यक्रम.

नांदेड। स्वातंत्र्यदिना निमित्त नांदेड महिला कांग्रेस जिल्हा उपाध्यक्षा नाजताई शेख यांच्या वतीने वृक्ष वाटप कार्यक्रमचा आयोजन करण्यात आले.या प्रसंगी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार प्रत्यक्ष हजेरी लावून त्यांच्या हस्ते वृक्ष वाटप करण्यात आले.तसेच काँग्रेसचे आमदार पदासाठी इच्छुक उमेदवार राजेश पावडे यांनीही या कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली तसेच या कार्यक्रमास काँग्रेस पक्षाचे विठ्ठल पावडे हेही आवर्जून उपस्थित होते.

वृक्ष वाटप करून नाज़ताई शेख यांनी सांगितले की ग्लोबल वार्मिंग मुळे होत असलेल्या हवामान बदलात होणाऱ्या फरकाला आळा घालण्यासाठी केवळ एकच पर्याय आहे,ते म्हणजे प्रत्येक घरात प्रत्येक माणसाने एक एक झाड लावावे जेणेकरून हवामान बदलात जास्त फरक पडणार नाही आणि आपण ग्लोबल वार्मिंग ला थांबवू शकू.

या कार्यक्रमास काँग्रेसचे पदाधिकारी जसिका शिंदे,अर्चना ताई,सुरेखा ताई तसेच सुनिता गवळी,रिजवान पटेल.नईम भाई हेही उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी नाज़ताई शेख यांनी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

Comments


bottom of page