
शहरीय पोलिसा सारिखे अता वाहतूक पोलिसांसाठी ही नवीन कायदा विषयी मार्गदर्शन शिविरचा आयोजन करण्यात येत आहे.त्यात विक्रोली आणि चेंबूर वाहतूक पोलिसांनी या साठी मार्गदर्शन शिविरच्या आयोजन केले.

मिळाली माहितीनुसार विक्रोली आणि चेंबूर वाहतूक पोलिसा तर्फे नवीन कायदा संदर्भात मार्ग दर्शन शिविरच्या आयोजन करण्यात आले.त्यात विक्रोली कोर्ट बार एशोसीयसन अध्यक्ष ॲड समाधान उत्तम सुलाने तसेच अँड योगिता सुनील गाडे यांच्या माध्यमातून नवीन कायद्याचं मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले.त्यामध्ये सन्माननीय जेव्ही एल आर तसेच पूर्व द्रुतगती महामार्ग परिक्षेत्र वाहतूक मुंबई चे सहायक पोलीस आयुक्त श्री विजय सिंह बागल तसेच अशोक पोपटराव लांडगे प्रभारी पोलीस निरीक्षक विक्रोळी वाहतूक विभाग यांच्या कार्यालयामध्ये दिनांक ०३/०३/२०२५ रोजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय न्याय सहायता तसेच भारतीय साक्ष अधिनियम २०२४ नवीन कायद्याचे मार्गदर्शन वाहतूक शाखेतील सर्व अंमलदारांना तसेच पोलीस प्रशासनांना त्याच प्रकारे पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

तसेच चेंबूर वाहतूक विभाग यांच्या विद्यमाने नवीन कायद्याचं मार्गदर्शन त्याच प्रकारे नवीन कायद्याचं प्रशिक्षण सत्र ॲड समाधान उत्तम सुलाने तसेच अँड योगिता सुनील गाडे यांनी दिनांक ०५/०३/२०२५ रोजी तसेचवरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जयवंत पांडुरंग संकपाळ त्याच प्रकारे अंमलदारांचे इन्चार्ज मनोज फराटे यांच्या माध्यमातून सर्व अंमलदारांना तसेच सर्व अधिकाऱ्यांना त्याच प्रकारे सामाजिक व सामान्य जनतेला भारतीय न्यायसहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय साक्ष अधिनियम या कायद्याचे मार्गदर्शन सर्वांना केले तरी सर्वांचे मनापासून आभार मानले.
コメント