top of page
Writer's pictureRavi Nishad

पत्रकारांचे विविध मांगन्या साठी आंदोलन

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मिडीयाचे आंदोलन

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना दिले निवेदन

छत्रपती संभाजीनगर, ता. 4 : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने दैनिक, साप्ताहिक, टीव्ही, रेडिओ या वेगवेगळ्या विभागांतील विषयाला घेऊन राज्यातील हजारो पत्रकारांनी गुरवार (ता. 4 ) जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. सकाळी १० ते ४ या वेळेत छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे, राष्ट्रीय संघटक परवेज खान यांच्या मार्गदर्शनात व साप्ताहिक विंगचे मराठवाडा अध्यक्ष अब्दुल कय्यूम यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जिल्हाध्यक्ष डॉ शकील शेख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 'व्हॉईस ऑफ मीडिया'ने खालील मागण्या केल्या आहेत. यामध्ये १) विधानसभा निवडणुकीत, सणवार, उत्सव या काळात यादीवरील सर्व छोटे दैनिक, सर्व साप्ताहिक, लोकाभिमुख असलेल्या न्यूज पोर्टल, यूट्यूब चॅनलला पण देण्यात याव्यात. सर्वांना समान न्यायाने जाहिरातीचे वाटप करण्यात यावे. २) शासनाकडून देण्यात येणाऱ्या जाहिराती दैनिकाप्रमाणे साप्ताहिकांनाही देण्यात याव्यात. वर्गवारीनुसार अन्याय करण्यात येऊ नये. ३) आर. एन. आय. कडून नवीन नियमावलीनुसार लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात. रेल्वे प्रवासासाठी अधिस्वीकृती धारकांना पुन्हा सवलत सुरू करावी. ४) २५ वर्ष पूर्ण केलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना द्वैवार्षिक तपासणीतून वगळण्यात यावे. तसेच २५ वर्ष पूर्ण केलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना वर्धापन दिनाची विशेष जाहिरात देण्यात यावी. ५) टीव्हीमध्ये काम करणाऱ्या स्टींजर, पत्रकारांचा मानधना संदर्भातला ठोस निर्णय घ्यावा. एका बातमीसाठी चार वर्षापूर्वी एक हजार रुपये मिळायचे, आता दोनशे रुपये मिळतात. ६) टीव्हीच्या टीआरपी स्पर्धेमुळे टीव्हीत काम करणारा प्रत्येक पत्रकार आज हैराण आहे. याचे कारण टीआरपी आहे. टीआरपीची जीवघेणी स्पर्धा बंद करण्यात यावी आणि टीव्हीत काम करणाऱ्या पत्रकाराला वाचवावे. ७) वर्तमानपत्रांमध्ये मिळणाऱ्या छोट्याशा मानधनावर पत्रकारांचे घर चालत नाही, त्यामुळे या मानधना संदर्भात ठोस निर्णय घेण्यासंदर्भामध्ये कमिटी स्थापन करावी. त्या कमिटीच्या सूचनेप्रमाणे पत्रकारांचे मानधन ठरवण्यात यावे. सध्या असलेल्या आयोगाचे नियम कोणीही पाळत नाही. ८) पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासंदर्भामध्ये असणारी कमिटी, तसेच अधिस्वीकृती कमिटी संदर्भामध्ये असणारा जुना जीआर रद्द करून नवीन जीआर तयार करावा. राज्यात चांगले काम करणाऱ्या पत्रकारांच्या संघटनांना 'त्या' कमिटीवर काम करण्यासंदर्भामध्ये संधी द्यावी. ९) सर्वच वृत्तपत्रांचे २५ टक्के जाहिरात दर सरसकट वाढवून देण्यात यावेत. कलर जाहिरातींचा प्रीमियमही वाढून देण्यात यावा. १०) सरकारी आणि खाजगी या दोन्ही रेडिओमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनाच्या बाबतीमध्ये शासनाने नियमावली ठरवून द्यावी. ११) काळाप्रमाणे डिजिटल मीडियाने आपले पाऊल जोरदार टाकलेले आहे. जे न्यूज पोर्टल, न्यूज यूट्यूब चॅनल लोकाभिमुख, अधिक लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत, त्यांना शासनाच्या यादीवर घेण्यात येऊन त्यांना शासकीय जाहिराती देण्यात याव्यात. १२) सेवानिवृत्ती योजनेची वाढवलेली रक्कम येत्या महिन्यापासून देण्यात यावी. जे जे श्रमीक आहेत त्यांना राज्य शासनाच्या सेवानिवृत्ती योजनेचा लाभ मिळावा. इत्यादी मागण्यांचा समावेश होता.

यावेळी गणेश पवार, सुजित ताजने,शारेक नक्शबंदी, सावेश जाधव, ॲड सय्यद मोईन,सय्यद शब्बीर,सय्यद करीम,शाकेर चिस्ती, मोहम्मद इसाकोद्दीन,जावेद खान, उपसंपादक अंकिता गजहास,अनीस रामपुरे,शेख इलियास,शेख रफिक, नेहा खान,अब्दुल गणी,शफी मिर्झा, प्रभाकर पाटणे,गणेश महाले,मेराज खान,सय्यद लायकोदिन,अजमत पठाण,शेख मोहसीन,दिशा सुरवसे पाटील,डॉक्टर शकील शेख,काझी नाझीमुद्दीन,हसन शहा,सारंग बोराडे, शेख अब्दुल जब्बार,मोहसीन खान, फैयाज सौदागर,जफर खान जब्बार खान,नदीम सौदागर, सुरेश शिरसागर,अकलाक देशमुख, सदिक अली, जावेद पटेल, शेख सईद, एयफाझ खान, उमेश जोशी, सय्यद फिरोज, प्रभाकर पटने, बबन सोनवणे, रतन कुमार साळवे, सलीम पटेल वाहेगावकर, राजु प्रधान, प्रल्हाद गवळी, झाकेर सिद्दीकी, असलम खान,शेख कलीम आरेफ देशमुख आदींची उपस्थिती होती. त्यावेळी आंदोलनास मालक संपादक महासंघाच्या पाठिंबा, प्रेस एडिटर फोरमच्या वतीने पण पाठिंबा देण्यात आलेला आहे.रतन कुमार साळवे,अब्दुल गणी,सलीम पटेल वाहेगावकर आदींनी व्हॉइस ऑफ मीडियाच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.

Commenti


bottom of page