घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघात रोचक लढत
एड़.नित्यानंद शर्मा प्रचारात आघाडीवर.

मुंबई : घाटकोपर पूर्व 170 विधानसभा मतदार संघात एनडीएचे उमेदवार आणि एमव्हीएचे उमेदवार,अपक्ष उमेदवार एड.नित्यानंद शर्मा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने या विधानसभा मतदार संघातील लढत रोचक बनली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,पत्रकारितेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारे नित्यानंद शर्मा हे आपल्या एका संस्थेच्या माध्यमातून घाटकोपर तसेच संपूर्ण मुंबईकरांसाठी नेहमीच उपलब्ध असतात.या विधानसभा मतदार संघात त्यांनी जनतेत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे,श्री शर्मा यांनी त्यांच्या विकासनामा पत्राद्वारे म्हटले आहे की,जर जनतेने त्यांना निवडून दिले तर ते प्रथम पंतनगरच्या पोलीस कॉलोनीचा पुनर्विकास करतील,येथे उच्च दर्जाचा महाविद्यालय बांधतील,विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांमध्ये विना देणगी प्रवेश देतील,घाटकोपरचा सर्व परिसर स्वच्छ ठेवतील.हा परिसर घाणमुक्त करण्याबरोबरच येथील सर्व झोपडपट्टीवासीयांना 500 चौरस फुटांची घरे देण्यासाठी प्रयत्न करतील,कामराज नगर आणि रमाबाई नगरच्या एसआरए योजनांना गती देऊन हा परिसर लवकरात लवकर झोपडपट्टीमुक्त करू.20 नोव्हेंबरला इथले मतदाता "पाटी" निशानीवर बटण दाबून मला मतदान करतील तर मी सर्व काही करणार जे एका आमदाराचा अधिकारत असते,असे आवाहन त्यांनी केले आहे की "मी काही नेता नाही" अभिनेता नाही,मी तुम्हा सर्वांचा भाऊ आणि मुलगा आहे",असे सांगितले जाते की,श्री शर्मा यांना परिसरातील जनतेचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे, त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातील लढत रोचक होत आहे.
Comments